विदर्भाचे रॉबिनहुड - शामा दादा कोलाम
विदर्भाचे रॉबिनहुड - शामा दादा कोलाम विदर्भाचे रॉबिनहुड - शामा दादा कोलाम यांचा जन्म कोलाम जमातीत यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील कोंढा गावी २६ नोव्हेंबर १८९९ साली झाला. गरिबांचा रखवाला आणि धनदांडग्यांचा गर्दनकाळ अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात त्यांनी निजामाशी एकतर्फी झुंज दिली. इंग्रज, निजाम, सावकार, धनदांडग्या लोकांच्या विरोधात गरिबांसाठी त्यांनी हातात बंदूक घेऊन सशस्त्र संघर्ष केला. ते धनदांड्यांना लुटत आणि गरिबांना मदत करत त्यामुळे ते विदर्भाचे रॉबिनहुड म्हणून ओळखले जातात. यवतमाळ जिल्ह्यातील बीटरगाव गावाच्या बाजूला चार किलोमीटवर शामा कोलाम टेकडी आहे. त्यांचा जन्म कळंब तालुक्यातील निरंजन माहूर या गावी झाला होता असेही काही लोक मानतात. ते एक सामान्य नागरिक होते. धनदांडग्या लोकांची गरिबांची करत असलेल्या शोषणाबाबत त्यांना चीड होती त्यामुळे ते धनदांडग्या लोकांना लुटत ती लूट टेकडीवर ठिकठिकाणी पुरून ठेवत होते. आणि त्या टेकडी जवळील घनदाट जंगलात त्यांचे वास्तव्य होते. अनेक लोक या टेकडीवर गुप्तधन शोधण्यासाठी जातात. इंग्रज शिपाई देखील त्यांच्या शोधास...