बोलीभाषे कडुन प्रमाण भाषेकडे

 जि. प. शाळा गावपोड शिवणी. ता. घाटंजी जि. यवतमाळ 💙

💙वर्ग: १ला,💙विषय: भाषा

💙समस्या: विद्यार्थ्यांची मात्रुभाषा कोलामी असल्यामुळे शाळेत आल्यावर मराठी कळत नाही.....

⚡कारण: १००% कोलाम वस्ती त्यामुळे कुटुंबात व वस्तीत कोलामीच बोलली जाते..

💙उपक्रमाचे नाव: (कोलामी)बोली भाषेकडुन (मराठी)प्रमाण भाषेकडे.

💙हेतु: विद्यार्थ्यांनां त्यांच्या बोलीभाषेवरुन प्रमाण भाषेवर नेने..

💙उपक्रमाची कार्यवाही:

⚡सर्वात आगोदर मोठे विद्यार्थ्याच्या मदतीने बोलीभाषेतील शब्दांचा संग्रह केला..

⚡विद्यार्थ्याकडुनच चित्र दाखवुन क्रुती करुन त्यांच्या बोलीभाषेतील शब्द काढुन घेतली..

⚡त्यांनां त्याच्याच बोलीभाषेत सुरवातीला बोलु दिले. बोलीभाषेतील पारंपारीक गीते, गोष्टी त्याच्याकडुनच काढुन घेतली यामुळे विद्यार्थी शाळेत रमला..

⚡विद्यार्थ्यांशी त्यांच्या बोलीभाषेत संवाद साधन्यासाठी आम्ही बोलीभाषेतील वाक्यरचना, व्याकरण समजुन घेन्याचा प्रयत्न केला.

⚡विद्यार्थ्याना प्राथमिक सुचना त्यांच्या बोलीभाषेतुन दिल्या.

⚡प्राथमिक संवाद त्यांच्या बोलीभाषेतुन साधण्याचा प्रयत्न केला त्यामुळे विद्यार्थी आमच्या जवळ आली.

⚡विद्यार्थांशी खुप सा-या अनौपचारीक गप्पा केल्या त्यामुळे न बोलनारी मुले बोलायला लागली..

⚡चित्र दाखविले विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव त्यांच्या बोलीभाषेत सांगीतले आम्ही तेच मराठी व इंग्रजी मधे सांगीतले.

⚡ क्रुती केली तीला त्यांच्या बोलीभाषेत काय म्हनतात ते त्यांनी सांगीतले आम्ही तेच मराठी व इंग्रजीत सांगीतले..

⚡एखादी अमुर्त संकल्पना समजावण्यासाठी वेगवेगळे प्रयाेग केले समजेपर्यंत वेळ दिला..

⚡विद्यार्थी हळुहळु प्रमाण भाषा समजायला लागले.

⚡आज १/२ वर्गातील विद्यार्थ्याने बोलीभाषेत बोलले ३/४ वर्गातील विद्यार्थी मराठी मधे छान भाषांतर करतात.

⚡आता वर्ग ३/४/५ चे विद्यार्थी मराठी समजतात, वाचतात, लिहतात व मराठीतील अभ्यासक्रम आनंदाने शिकतात.

💜💜हाच उपक्रम शिक्षणाच्या वारीमधे स्टॉल क्र. ४८ वर मांडन्याची संधी आमच्या शाळेला मिळली होती🙏🏻🙏🏻💜💜


प्रदिप जाधव

Comments

Popular posts from this blog

मराठी - मावची गोष्टी (भाषांतरित)

वेगळी भाषा (बोलीभाषा) बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी हस्टपुस्तिका

यवतमाळ डाएट ने तयार केलेली कोलाम बोलीभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी तयार केलेली शिक्षक हस्तपुस्तिका